www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सणासुदीच्या दिवसात एक खुशखबर आहे. या कर्मचाऱ्यांना १० टक्के महागाई भत्ता देण्यास वित्त विभागानं मंजुरी दिलीय. यामुळं आता सरकारी कर्मचाऱ्यांचा एकूण भत्ता ९० टक्के होणार आहे.
केंद्राप्रमाणं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्यातही वाढ करण्यात आलीय. या निर्णयामुळं आगोदरच वेगवेगळ्या आर्थिक संकटाशी झुंज देणाऱ्या राज्य सरकारच्या तिजोरीवर ८०० कोटींचा बोजा पडणार आहे. मात्र राज्यातल्या चाकरमान्यांची दसरा-दिवाळीही जोरात जाणार हे निश्चित.
दरम्यान, केंद्राच्या पार्श्वभूमीवर वेतनभत्ते मिळावे यासाठी आज करण्यात येणाऱ्या ` दोन तास काम बंद` आंदोलनावर कर्मचारी संघ ठाम आहेत, असं राजपत्रित अधिकारी संघाचे ग. दि. कुलथे यांनी स्पष्ट केलंय. आज सकाळी १० ते १२ या कालावधीत मंत्रालयासह राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी काम बंद ठेवणार आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.