मुंबई : म्हाडाने मुंबईतील ९९७ घरांची जाहिरात अखेर प्रसिद्ध केली आहे, म्हाडाच्या संकेत स्थळावर येत्या बुधवारपासून इच्छुकांना ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज भरण्याची मुदत १४ मेपर्यंत आहे, तर ३१ मे रोजी सोडत काढणयात येणार आहे.
यंदा उच्च उत्पन्न गट नाही
वांद्रे पोटनिवडणुकीच्या आचारसंहितेमुळे लॉटरीची जाहिरात येण्यास उशीर झाला. कोकण मंडळासाठी डिसेंबरमध्ये वेगळी सोडत घेतली जाणार आहे. सर्वसामान्यांसाठी आनंदाची बाब म्हणजे यावर्षी म्हाडाच्या लॉटरीत अत्यल्प, अल्प आणि मध्यम उत्पन्न गटातील घरांचा समावेश आहे, उच्च उत्पन्न गटाचा यंदाच्या लॉटरीत समावेश नाही.
अंध आणि अपंग प्रवर्गाच्या ६६ घरांचीही लॉटरी
दुसरी महत्वाची बाब म्हणजे, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही गेल्या सहा महिन्यांपासून प्रलंबित राहिलेल्या अंध आणि अपंग प्रवर्गासाठी आरक्षित ६६ घरांच्या लॉटरीसाठी इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
भाजपा-शिवसेनेचाही महाग घरं देण्यावर जोर
आघाडी सरकारच्या काळात म्हाडाच्या घरांच्या किंमती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या नसल्याची बोंब भाजपा-शिवसेनेची होती, मात्र ते सत्तेत आल्यानंतरही चित्र बदललेलं दिसत नाही, कारण यंदाही सदनिका महागड्याच आहेत.
म्हाडाचा अर्ज भरण्यापूर्वी महत्वाची माहिती
१) अर्ज भरण्याची सुरुवात : १५ एप्रिल ( दुपारी २ पासून)
२) अर्ज भरण्याची अंतिम मुदत : १४ मे (संध्याकाळी ६ पर्यंत)
३) सोडत निघण्याची तारिख : ३१ मे २०१५
कुणाला किती आरक्षण
१) अंध आणि शारीरिकदृष्ट्या अपंग : ६६ घरे
२) अनुसूचित जाती-नवबौद्धांसाठी : ११० घरे
३) अनुसूचित जमाती : ६० घरे
४) भटक्या जमाती : १५ घरे
५) विमुक्त जमाती : १५ घरे
६) पत्रकार : २५
७) स्वातंत्र्यसैनिक : २५ घरे
८) अंध व शारीरिक अपंग : ३० घरे
९) शहीदांचे कुटुंबिय व अपंग सैनिक : २० घरे
१०) माजी सैनिक : ५० घरे
११) शासकीय निवासस्थानी राहणारे आणि येत्या 3 वर्षात निवृत्त होणारे केंद्रीय कर्मचारी : ५० घरे
१२) कलाकार : २० घरे
१३) शासन स्वेच्छा निर्णयाखाली : १९ घरे
मासिक उत्पन्नाची मर्यादा
१) अत्यल्प उत्पन्न गट : रुपये १६ हजार
२) अल्प उत्पन्न गट : रुपये ४० हजार
३) मध्यम उत्पन्न गट : रुपये ७० हजार
मुंबईतील म्हाडाची उपलब्ध घरे
प्रतीक्षानगर - मध्यम उत्पन्न गट – ५६
मानखूर्द - अल्प उत्पन्न गट – ६६
गवाणपाडा, मुलुंड - मध्यम उत्पन्न गट - १८५
गवाणपाडा, मुलुंड - अल्प उत्पन्न गट - १८२
मालवणी, मालाड - अत्यल्प उत्पन्न गट - २३२
उन्नतनगर, गोरेगाव - अल्प उत्पन्न गट - १८२
उन्नतनगर, गोरेगाव - अत्यल्प उत्पन्न गट - ९४
ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी वेबसाईट
www.mhada.gov.in
https://lottery.mhada.gov.in
www.mhada.maharashtra.gov.in
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.