विकृतीचा कळस : ३ वर्षांच्या चिमुरडीवर २२ वर्षाच्या नराधमाचा अत्याचार

घाटकोपरच्या असल्फा भागात एका 3 वर्षांच्या चिमुरडीवर 22 वर्षांच्या नराधमानं अत्याचार केल्यामुळं खळबळ उडालीय. दिवसागणिक वाढत चाललेल्या अशा विकृतींमुळं पालक मंडळी चांगलीच काळजीत पडलीयत. 

Updated: Dec 1, 2015, 11:08 AM IST
विकृतीचा कळस : ३ वर्षांच्या चिमुरडीवर २२ वर्षाच्या नराधमाचा अत्याचार title=

प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, घाटकोपर : घाटकोपरच्या असल्फा भागात एका 3 वर्षांच्या चिमुरडीवर 22 वर्षांच्या नराधमानं अत्याचार केल्यामुळं खळबळ उडालीय. दिवसागणिक वाढत चाललेल्या अशा विकृतींमुळं पालक मंडळी चांगलीच काळजीत पडलीयत. 

मुंबईतलं घाटकोपर सध्या एका बिभत्स आणि विकृत घटनेनं हादरलंय. घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबेडकर नगर वसाहतीत राहणा-या 3 वर्षांच्या चिमुरडीवर 22 वर्षांच्या संजय जैसवार यानं चॉकलेटचं अमिष दाखवून अत्याचार केले. रडणा-या मुलीकडं चौकशी केल्यावर तिनं घडलेला प्रकार सांगितला आणि नराधर संजय जैसवारला पोलिसांनी अटक केली. 

सध्या बाजारात असणारं अश्लिल साहित्य आणि व्हिडिओजमुळं अशा घटना वाढत असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. 

समाजात वाढत चाललेल्या विकृती आणि अल्पवयीन असल्याचा आरोपी घेत असलेला फायदा या दोन्ही बाबी चिंताजनक आहेत. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.