7 जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाला अडचणी

राज्य सरकारनं मराठा-मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला, मात्र आता त्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण होतायत. यात प्रमुख्यानं आदिवासी क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

Updated: Jul 6, 2014, 05:49 PM IST
7 जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षणाला अडचणी title=

मुंबई : राज्य सरकारनं मराठा-मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला, मात्र आता त्याच्या अंमलबजावणीमध्ये अडथळे निर्माण होतायत. यात प्रमुख्यानं आदिवासी क्षेत्रात मोडणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश आहे.

आदिवासी क्षेत्रामध्ये मोडणा-या जिल्ह्यांमध्ये तसंच तालुक्यांत हे आरक्षण लागू केलं जाऊ शकत नाही, यासाठी राज्यपालांनी 9 जून रोजी काढलेला अद्यादेश सरकारसाठी अडचणीचा ठरत आहे. 

राज्यपालांच्या या अध्यादेशानूसार सात आदिवासी जिल्ह्यांमध्ये मराठा आरक्षण लागू करण्यात सरकार समोर पेच निर्माण झालाय.
आरक्षणाचा पेच कुठे निर्माण झालाय पाहूयात.. 

अनुसूचित जिल्ह्यांमध्ये समावेश असलेल्या ठाणे, नाशिक, नंदुरबार, चंद्रपूर, नागपूर, अमरावती आणि यवतमाळ आरक्षणाला अडचणी येणार आहेत.
 
यातल्या  डहाणू, जव्हार, वाडा, शहापूर, पालघर, वसई, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, सुरगाणा, तळोदा, नवापूर, नंदुरबार, शहादा, चिखलदरा, यवतमाळ, रामटेक, कोरपना या तालुक्यांमध्ये पेच निर्माण झाला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.