मुंबई : दिवसागणिक मुंबईतील प्रवास कटकटीचा होत आहे. त्यातच मुंबईचा मेट्रो २ प्रोजेक्ट रखडण्याची चिन्हे आहेत. मेट्रो दोनचा एमएमआरडीएने रिलायन्स इन्फ्रासोबतचा करार रद्द केला आहे.
नियोजित वेळेत काम पूर्ण न केल्यामुळे मेट्रो दोनसाठी रिलायन्स इन्फ्रासोबत करण्यात आलेला करार एमएमआरडीएने रद्द केला आहे. करार रद्द करण्यात आल्यानंतर एमएमआरडी आता हे काम करणार आहे. मात्र, हे काम कधीपर्यंत पूर्ण होईल, याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
मेट्रो २ हा ३२ किलोमीटर लांबीचा प्रकल्प होता आणि या प्रकल्पाचं बजेट १२ हजार कोटींचं होतं. चारकोप, वांद्रे, मानखुर्दपर्यंत ही मेट्रो धावणार होती.आता रिलायन्स इन्फ्रासोबतसोबतचा करार रद्द झाल्यामुळं पुढं काय होणार याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.