न्यूड सीनमुळे माधुरीने नाकारला चित्रपट

चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात असणाऱ्या न्यूड सीन्समुळे धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने हा चित्रपट काही वर्षापूर्वीच नाकारला होता, ही माहिती आता समोर आली आहे. 

Updated: Nov 13, 2014, 04:12 PM IST
न्यूड सीनमुळे माधुरीने नाकारला चित्रपट title=

मुंबई : चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात असणाऱ्या न्यूड सीन्समुळे धकधक गर्ल माधुरी दीक्षित हिने हा चित्रपट काही वर्षापूर्वीच नाकारला होता, ही माहिती आता समोर आली आहे. 

रंग रसिया हा चित्रपट चित्रकार राजा रवि वर्मा यांच्या जीवनावर आधारीत आहे. हा चित्रपट केतन मेहता यांनी बनविला आहे. राजा रवि वर्मा यांची प्रेरणास्त्रोत सुगंधा होती. तिला पाहूनच काही न्यूड पेंटिंग्ज राजा रवि वर्मा यांनी रेखाटल्या होत्या. त्यामुळे राजा रवि वर्मा यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटात न्यूड सीन खूप महत्त्वाचे होते. केतन मेहता यांच्या ‘रंग रसिया’ या चित्रपटात नंदना सेन हिने बोल्ड सीन खूप सहजतेने दिले आहेत.  

काही वर्षांपूर्वी शाजी एन करूण यांना राजा रवि वर्मा यांच्यावर चित्रपट बनविण्याचा विचार आला. रवि वर्मांच्या भूमिकेसाठी त्यांनी अजय देवगण आणि सुगंधाच्या भूमिकेसाठी माधुरी दीक्षित यांची निवड केली होती. दोघांना स्क्रिप्टही पसंत आली. पम न्यूड सीन्समुळे गोष्ट पुढे गेली नाही. 

माधुरीने न्यूड सीन्सला नकार दिला. पण करूणनुसार हा चित्रपट न्यूड सीन विना चित्रपट बनविणे शक्य नाही. त्यामुळे शेवटी माधुरीने हा चित्रपट नाकारला. माधुरीच्या या निर्णयामुळे हा चित्रपटच रद्द झाला होता. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.