मुंबई : १००० आणि ५०० रुपयांच्या जुन्या नोटांच्या बंदीमुऴे राज्यातील पालिकांच्या तिजोरीत आज आणखी भर पडणार आहे. आज मध्यरात्रीपर्यंत पालिकांची कर स्वीकारणारी काऊंटर सुरू राहणार आहे. गेल्या आठवड्यात विविध करांपोटी तब्बल तीनशे कोटींहून रुपयांचा कर भरणा झाला आहे.
थकलेला मालमत्ता कर भरून पाचशे आणि हजाराच्या नोटा खपवण्यासाठी एकच गर्दी उसळलीय. सध्याही मुदत मध्यरात्री संपणार आहे. पण आता केंद्रानं जुन्या नोटांना १० दिवसांची आणखी एक संजीवनी दिल्यानं राज्य सरकारही कर वसुलीसाठी या नोटा स्वीकारणं सुरूच ठेवणार का याकडे सर्वांचं लक्ष आहे.