राज ठाकरेंना अटक, आरसीएफ पोलीस ठाण्यात राज

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चुनाभट्टीजवळ अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तर कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 12, 2014, 04:13 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना चुनाभट्टीजवळ अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. दरम्यान, त्याचवेळी पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. तर कार्यकर्ते अधिक आक्रमक झाले आहेत.
वाशीटोल नाक्यावर आंदोलन करण्यासाठी राज ठाकरे आज कृष्णकुंजवरून वाशीकडे रवाना होत होते. यावेळी त्यांना सायनजवळ पोलिसांनी अडवलं. याठिकाणी आमदार बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी पोलिसांना सांगण्याचा प्रयत्न केला. आमचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, आम्ही मागे हटणार नाही, असे नांदगावकर यांनी बजावले. त्याचवेळी पोलिसांनी आम्हाला बळाचा वापर करण्यास भाग पाडू नका, असे स्पष्ट केले. त्यामुळे येथे थोडेसे तणावाचे वातावरण होते. राज यांना अटक केल्यानंतर येथे वाहतुकीची कोंडी झाली.
एक्स्प्रेस वे वर मनसेचा पहिला दणका दिसून आला. मुंबई-पुणे वाहतूक विस्कळीत झाली आहे. राज्यातल्या टोल नाक्यांना पोलीस छावणीचे स्वरुप आले आहे. काही ठिकाणी टायरमधील हवा सोडण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.
मनसे आंदोलन रोखण्यासाठी नाशिकात शीघ्र कृती दल तैनात कण्यात आली आले आहे. ठिकठिकाणी कार्यकर्त्यांची धरपकड होत असल्याने आंदोलन अधिक तीव्र होत आहे. कायदा मोडणा-यांवर कारवाईचा करण्याचा इशारा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रास्ता रोकोचा पहिला दणका मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ला बसलाय. लोणावळा जवळ खंडाळा-बोर घाटात आज सकाळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या गाड्यांची हवा सोडली. मुंबईहून पुण्याला जाणा-या लेनवर हे आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे वाहतूक तासभर ठप्प झाली होती. तर इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर तीन हात नाक्याजवळ अज्ञात व्यक्तींनी टायर जाळलेत.

आंदोलनाचा घटनाक्रम
मुंबईतील रेल्वे वाहतूक सुरळीत आहे.
दुपारी १.०० वाजता
मुख्यमंत्र्याचा फोन झाला. उद्या ९ वाजता चर्चा होणार आहे. माझा हेतू साध्य झाला. मला कोणाला त्रास द्यायचा नव्हता - राज ठाकरे
सकाळी १२.५८ वाजता
मनसेचे टोल विरोधी आंदोलन तूर्तास मागे
राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन
दुपारी १२.५० वाजता
राज ठाकरे यांचे कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन
दुपारी १२.४५ वाजता
राज ठाकरे यांना पोलिसांनी सोडलं
उद्या सकाळी ९ वाजता मुख्यमंत्री चव्हाण यांच्याशी चर्चा
सकाळी ११.४२वाजता
सर्व काही शांततेच्या मार्गाने चाललं असताना राज यांना अटक का - शर्मिला ठाकरे
सकाळी ११.३० वाजता
विक्रोळी येथे अज्ञाताला मनसे कार्यकर्त्यांकडून मारहाण
सकाळी ११.२२ वाजता
औरंगाबादमध्ये हिंसात्मक आंदोलन...
काही ठिकाणी दगडफेकीचे वृत्त
सकाळी ११.२१वाजता
ठाण्यात काही ठिकाणी दुकाने बंद करण्यास सुरूवात
सकाळी ११.२०वाजता
आंदोलनाची तीव्रता कमी झाल्यानंतर राज ठाकरेंना सोडू - पोलीस
सकाळी ११.१९ वाजता
राज यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांच्यासोबत कार्य़कर्ते आक्रमक
राज अटकेनंतर मनसे कार्यकर्त्यांचा ठिय्या
सकाळी ११.१५ वाजता
राज ठाकरेंसोबतचा कार्यकर्त्यांचा ताफा आरसीएफ पोलिसांनी रोखला
राज अटकेनंतर मनसे कार्यकर्त्यांचा ठिय्या
सकाळी ११.०२ वाजता
शर्मिला ठाकरे यांचा आरसीएफ पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर मनसे कार्यकर्त्यांचा ठिय्या
सकाळी १०.५७ वाजता
राज ठाकरे यांना अटक केल्यानंतर मनेस कार्यकर्त्यांची बाचाबाची सुरू
वाहतुकीची कोंडी कायम...कार्यकर्ते रस्त्यावरच
सकाळी १०.५० वाजता
राज ठाकरे यांना आरसीएफ पोलीस ठाण्यात नेणार
आमदार नितीन सरदेसाई, बाळा नांदगावकर यांना अटक
सकाळी १०.४२ वाजता
चुनाभट्टी येथे मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी
कार्यकर्ते आक्रमक...मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र
राज ठाकरे यांना पोलिसांनी केली अटक
सकाळी १०.३७ वाजता
राज ठाकरे यांना पोलिसांनी केली अटक
वाशीकडे जाताना केली अटक
सकाळी १०.३५ वाजता
राज ठाकरे पोलिसांच्या ताब्यात
सकाळी १०.३० वाजता
राज ठाकरे गाडीतून रस्त्यावर उतरलेत