Big Update : सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार नाहीत? संजय शिरसाट यांनी दिलेली माहिती खोटी?

सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होतील अशी अपेक्षा सर्वसामान्यांना होती. मात्र, प्रत्यक्षात घरांच्या किंमती कमी होणार नसल्याची माहिती समोर आली आहे.  

वनिता कांबळे | Updated: Jan 17, 2025, 07:20 PM IST
Big Update : सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार नाहीत? संजय शिरसाट यांनी दिलेली माहिती खोटी? title=

CIDCO Lottery 2025 :  गेल्या काही वर्षात सिडकोच्या घरांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे सिडकोची घरं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलीय. नुकतीच सिडकोनं नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेअंतर्गत 26 हजार घरांची लॉटरी काढली. त्या घरांच्चा किमती पाहून सर्वसामान्यांची झोप उडाली. सिडकोच्या घरांच्या किंमती कमी होणार असे संकेत सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी दिले होते. मात्र, संजय शिरसाट यांना सिडकोच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आले आहे. यानंतर आता सिडकोच्या लॉटरीबाबत धक्कादायक अपडेट समोर आली आहे.  सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याची माहिती समोर आली आहे. 

हे देखील वाचा... हटवेपर्यंत शिरसाट सिडकोच्या अध्यक्षपदावर का थांबले? मंत्रिमंडळात असतानाही लाभाच्या पदावर नियुक्ती

नवी मुंबईत सिडकोनं " माझे पसंतीचे घर" ही गृहयोजनेअंतर्गत  26 हजार घरांची घोषणा केली. आर्थिक दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटासाठी ही योजना आहे. तब्बल एक लाख 20 हजार नागरिकांनी यासाठी अर्जही केले. पण घरांच्या किमती जाहीर होताच सगळेच हताश झाले. घरांचे दर 25 लाख ते 97 लाख रूपयांपर्यत आहेत. यामुळे घरांच्या किंमती कमी कराव्यात अशी मागणी करण्यात येत होती.  घरांच्या किमती कमी करण्याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी म्हटलं होते. मात्र, असा कोणताच प्रस्ताव नसल्याची माहिती समोर आल्याने गोंधळ उडाला आहे.  

सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणारे नसल्याचे संकेत सिडको  सह  व्यसवस्थापकीय  संचालक  शंतनू गोयल यांनी दिले आहेत.  सिडकोच्या घरांच्या किमती कमी करण्याचा कुठलाही प्रस्ताव नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. 
 सिडकोने लॉटरीमध्ये विक्रीसाठी काढलेली घरं ती जाहीर केलेल्या किंमतीलाच विकलीच जातील असेही  शंतनू गोयल यांनी स्पष्ट केले आहे.  यामुळे  सर्वसामान्यांचा भ्रमनिरास  झाला आहे.  तर, दुसरीकडे संजय शिरसाठ यांनी दिलेली माहिती खोटी असल्याचीही चर्चा रंगली आहे.  सिडकोने घरांची किंमती या रेडीरेकनेर नुसार लावल्या आहेत. खाजगी बिल्डरप्रमाणेच सिडको देखील लिफ्ट, गार्डन, सह इतर अत्याधुनिक सुविधा देत असल्याने किमती बरोबर असल्याचे शंतनू गोयल यांनी सांगितले.