खासदार उद्यनराजे भोसले यांनी घेतली बिग बींची भेट

साता-याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज बॉलिवूडचे ख्यातनाम सुपरस्टार 'बिग बी' अमिताभ बच्चन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अमिताभ बच्चन यांना साता-यात आयोजित एका विशेष समारंभात शिवसन्मान पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

Updated: Mar 30, 2016, 11:55 PM IST
खासदार उद्यनराजे भोसले  यांनी घेतली बिग बींची भेट

मुंबई : साता-याचे खासदार आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज बॉलिवूडचे ख्यातनाम सुपरस्टार 'बिग बी' अमिताभ बच्चन यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. अमिताभ बच्चन यांना साता-यात आयोजित एका विशेष समारंभात शिवसन्मान पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे.

छत्रपती उदयनराजे कल्चरल फाउंडेशनतर्फे हा पुरस्कार देण्यात येणार आहे. बच्चन यांचा फिटनेस, उत्साह आणि कलाक्षेत्रातील कामगिरीबदद्ल हा पुरस्कार देत असल्याचं उदयनराजेंनी सांगितलं. भारतात असुरक्षित वाटणा-या लोकांचा त्यांनी समाचार घेतला.