मुंबई : एका पाच वर्षांच्या चिमुकल्याला त्याच्या आईच्या प्रियकरानं अमानुष मारहाण केल्याची घटना मुंबईतल्या विक्रोळीत घडलीय. एव्हढच नव्हे या मुलाच्या अंगावर त्यानं चटकेही दिले.
चिमुकल्या राजदीपच्या सतत रडण्याचा आवाज येत असल्यामुळं त्याच्या शेजाऱ्यांनी सतिश कोटियन यांच्या घरी विचारपूस केली असता त्यांच्या समोर हा धक्कादायक प्रकार आला. चिमुकल्या सतिशच्या अंगावर जागोजागी भाजल्याच्या खुणा दिसत होत्या.
या प्रकाराबद्दल शेजाऱ्यांनी विचारणा केली असता छोट्या राजदीपची आई कांचन हिनं त्यांनाच दमदाटी केली. त्यामुळे, आई आणि तिच्या प्रियकराच्या तावडीतून या चिमुरड्याची सुटका करण्यासाठी शेजाऱ्यांना शेवटी पोलिसांशी संपर्क करावा लागला.
विक्रोळी पोलिसांनी राजदीपची आई कांचन आणि तिचा प्रियकर सतिश कोटियन यांना ताब्यात घेतलंय.
वर्षभरापूर्वी नवऱ्याशी घटस्फोट घेऊन छोट्या राजदीपसह कांचन तिचा प्रियकर सतिशकडं राहायची. मात्र दोघांच्या प्रेमात अडथळा येत असल्यामुळं पाच वर्षांच्या राजदीपला हे दोघंही सतत त्रास द्यायचे, असं आता समोर येतंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.