मुंबई खड्डेमुक्तची आयुक्तांची घोषणा पोकळ

रविवारी रात्रीपर्यंत मुंबई खड्डेमुक्त करण्याची महापालिका आयुक्तांची घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे. कारण अजूनही मुंबई खड्डेमुक्त करण्यात महापालिकेला यश आलेलं नाही.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jul 30, 2013, 08:53 AM IST

www.24taas.com , झी मीडिया, मुंबई
रविवारी रात्रीपर्यंत मुंबई खड्डेमुक्त करण्याची महापालिका आयुक्तांची घोषणा केवळ घोषणाच राहिली आहे. कारण अजूनही मुंबई खड्डेमुक्त करण्यात महापालिकेला यश आलेलं नाही.
मुंबईत आजही हजोरो खड्डे जैसे थे असल्याचं झी मीडियाच्या पाहणीत दिसून आलंय. महापालिकेच्या मुख्यालयासमोरच खड्डे दिसतायत. अंधेरी जोगेश्वरीवरच्या डीएननगर परिसरातल्या मुख्य रस्त्यावरही खड्डे पहायला मिळतायत.
संपूर्ण रस्ता उखडल्याचं झी मीडियाच्या पाहणीत उघड झालंय. हा रस्ता खडीनं बुजवला होता. पण पावसानं तो पुन्हा उखडल्याचं दिसलं. तर वांद्र्यातल्या खेरवाडी परिसरात अजूनही खड्डे दिसून आले... ही परिस्थिती पाहिल्यानंतर रविवारी मध्यरात्रीपर्यंत मुंबई खड्डेमुक्त करण्याचा महापालिकेचा दावा फोल ठरलाय.
अंधेरी-जोगेश्वरी रोडवरील डीएन नगर परिसरातल्या मुख्य रस्त्यावरही खड्डे बुजवलेले दिसलेले नाहीत. इथला संपूर्ण रस्ता उखडलेला दिसून आलाय. हा रस्ता खडीनं बुजवलेला होता. पण पावसानं पुन्हा उखडलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.