मुंबई : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने(इस्त्रो) सुरु केलेल्या विद्यार्थी उपग्रह योजनेंतर्गत मुंबई आयआयटीचा प्रथम हा उपग्रह आज अवकाशाता झेपावला.
पीएसएलव्ही सी35 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. 10 किलो वजनाचा प्रथम या उपग्रहाद्वारे ऋण भार मोजता येणार आहे.
प्रथम या उपग्रहाचा कार्यकाल चार महिन्यांचा असेल. तब्बल नऊ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या उपग्रहाने यशस्वी उड्डाण केले.
आयआयटीचे तब्बल 100हून अधिक विद्यार्थी यात सहभागी झाले होते. सप्तर्षी बंडोपाध्याय आणि शशांक तामसकर या दोन विद्यार्थ्यांची ही संकल्पना होती.
प्रथमच्या यशस्वी प्रक्षेपणानंतर आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी जल्लोष केला. आमचा उपग्रह अवकाशात प्रक्षेपित होत असलेला हा क्षण आमच्यासाठी अनमोल आहे, अशी प्रतिक्रिया या वेळी आयआयटीच्या एका विद्यार्थ्याने दिली. देशातील 15 विद्यापीठांमध्ये उपग्रहातील माहितीचे संकलन होणार आहे. यात मालाडच्या अर्थव कॉलेजचाही समावेश आहे.