मुंबई : बेदरकारपणे गाडी चालवत दोन जणांवर चिरडणारी वकील जान्हवी गडकर दारुच्या नशेत असल्याचं उघड झालंय. तिच्या रक्तात चौपट अल्कोहोल असल्याचं वैद्यकीय चाचणीतून समोर आलंय.
१०० मिलीलिटर रक्तात ३० मिलीग्राम अल्कोहोल इतकी मर्यादा असते. मात्र जान्हवीच्या रक्तात यापेक्षा जास्त अल्कोहोल आढळल्याचं या चाचणीतून समोर आलंय. त्याआधी गुरुवारी सकाळी आरसीएफ पोलिसांनी आयरिश हाऊस पब इथं जाऊन चौकशी केली. मरीन प्लाझा हॉटेलमधून बाहेर पडल्यानंतर जान्हवीनं या पबमध्ये जाऊन आणखी मद्यसेवन केल्याचा संशय पोलिसांना आहे.
नागपाडा परिसरात राहणारे साबुवाला कुटुंबिय त्यांचा मुलगा दहावीची परीक्षा पास झाल्याचा आनंद साजरा करून घरी परत येत होते. अचानक दारूच्या नशेत गाडी चालवणाऱ्या जान्हवी गडकरनं त्यांच्या टॅक्सीला धडक दिली. यात दोन ठार तर ४ जण जखमी झाले होते.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.