मुंबई : पेंग्वीनच्या मृत्यूनंतर राजकीय वातावरण तापले आहे. मारुन दाखवले म्हणत राष्ट्रवादी युवक काँग्रेसची बॅनरबाजी शहरात दिसत आहे. शिवसेनेची पोस्टर लावून खिल्ली उडविल्याने शिवसैनिकांनी बॅनर फाडलेत.
मुंबईतल्या भायखळा इथल्या जिजामाता प्राणीसंग्रहालयात ठेवण्यात आलेल्या पेंग्विनपैकी एकाचा मृत्यू झाल्यानंतर आता राजकीय वॉर रंगल्याचे दिसत आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने शिवसेनेला लक्ष्य केले आहे. मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावून शिवसेनेच्या पेग्विंन आणण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला.
यावेळी पेग्विंनच्या मृत्यूला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित करत आदित्य ठाकरेंना टार्गेट केले आहे. मातोश्रीसमोरही हे बॅनर लावण्यात आले होते. मात्र शिवसैनिकांनी हे बॅनर फाडून टाकले.