मुंबई: स्वयंघोषित आध्यात्मिक गुरू राधे माँ मुंबईत पोहोचली आहे. औरंगाबादहून विमानानं राधे माँ मुंबईला परतली.
त्याआधी शनिवारी अख्खा दिवस राधे माँ चा मुक्काम नांदेडमधल्या सिटी प्राईड या थ्री स्टार हॉटेलमध्ये होता. तिथंच संपूर्ण दिवस राधे माँ होती. मात्र एकदाही ती हॉटेलमधून बाहेर पडली नाही. रात्री राधे माँ नांदेडहून औरंगाबादला परतली.
दरम्यान हुंडा छळ प्रकरणी सोमवारी मुंबई पोलीस राधे माँ ची चौकशी करणार असल्याची माहिती मिळत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं दिलेल्या माहितीनुसार राधे माँ सह सहा आरोपींविरोधात समन्स बजावण्यात आलाय. हे सहा आरोपी म्हणजे पीडित महिलेचे सासरचे लोक आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.