मुंबई: मुंबईत कुमार मंगलम बिर्ला यांनी ४२५ कोटी रूपयांना सर्वात महागडे जटिया हाऊस खरेदी करण्याचा विक्रम एका आठवड्यातच तुटला आहे.
आता हा रेकॉर्ड उद्योगपती सायरस पुनावालाच्या नावावर झाला आहे. त्यांनी दक्षिण मुंबईतील ब्रीज कँडी येथील लिंकन हाऊस ७५० कोटी रूपयांना खरेदी केले.
मुंबईमध्ये रिअल इस्टेट क्षेत्रात हा सर्वात मोठा सौदा आहे. लिंकन हाऊस हे अमेरिकन दुतावासाकडून संचलित केले जात होते.
दोन एकरमध्ये आहे लिंकन हाऊस
दोन एकरात विखुरलेल्या ग्रेड ३ लेव्हलची संपत्तीवर ५० हजारावर याचे बांधकाम आहे. या ठिकाणी नवीन वास्तू उभारणार आहे. या ठिकाणाला वांकानेर हाऊस म्हणून ओळखले जात होते. वांकानेर महाराजा प्रतापसिंहजी झाला यांचा हा महाल होता. त्याला १९५७मध्ये अमेरिकेने लीजवर देण्यात आला. त्याचे नाव बदलून लिंकन हाऊस करण्यात आले.
कोण आहे सायरस पूनावाला
७० वर्षीय पूनावालांची कंपनी सेरम इस्टिट्यूट ऑफ इंडिया ही सर्प दंशावर इलाज करणाऱ्या औषधं तयार करते. पूनावाला यांची एकूण संपत्ती ७.७ अब्ज डॉलर (५१० अरब रूपये) आहे.
आणखी वाचा - OMG! ४२५ कोटींचं मुंबईतील सर्वात महागडं घर कुमार बिर्ला घेणार
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.