मुंबई : नारायण राणे यांनी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या नाराजीची कारण मांडली. पराभवाचा मी वाटेकरी नाही, भविष्यातील पराभवाचा वाटेकरी व्हायचं नाही, तसेच आपल्या समर्थकांना पदं मिळालेली नाहीत असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
आपली कोणत्या पक्षाशी चर्चा झाली आहे का? यावर बोलतांना राणे म्हणाले, माझी कुणाशीही चर्चा झालेली नाही, तसेच कोणत्याही पक्षात जाण्याचा विचार अजून तरी माझ्या मनात नाही, मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, पक्षाचा दिलेला नाही असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांचा प्रशासनावर अंकुश नाही, पराभवानंतर मुख्यमंत्र्यानी कोणत्याही उपाय योजना केल्या नाहीत तसेच यश मिळण्यासारखं काम सरकार करत नाहीत, असंही राणेंनी म्हटलंय. मुख्यमंत्री आपल्या कारभारात स्वच्छ आहेत, वैयक्तिक कुणावर बोलू नये, म्हणजेच जे चांगलं आहे ते मी सांगतोय, असं राणेंनी म्हटलंय. पण मुख्यमंत्र्यांची कार्य़पद्धती शिथिल, बेभरवशाची असल्याचंही नारायण राणे यांनी म्हटलं आहे.
काँग्रेसमध्ये माझं वय वर्ष नऊ झालं आहे, पण 6 सहा महिने सांगून मला नऊ वर्षे ताटकळवलं, नऊ वर्षे उलटूनही आश्वासनाची पूर्तता केलेली नाही, पराभवाचा वाटेकरी मला व्हायचं नाही, असंही राणे यांनी यावेळी सांगितलं. विलासरावांबद्दल मला कधीच नाराजी नव्हती, सध्याच्या मुख्यमंत्र्यांना काढा, आणि मला बसवा ही भूमिका माझी नाही तसेच सध्या दुसऱ्या पक्षात जायचा विचार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
राजीनामा मंजूर केल्यानंतर पुढची भूमिका ठरवू, पराभवानंतर सत्ता कायम राखण्यासाठी कोणताही प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला नसल्याचा आरोपही नारायण राणे यांनी केला आहे.
(02.00 PM दुपारी) नारायण राणे यांच्या राजीनाम्याविषयी आपण सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.
1.05 वाजता
नारायण राणेंचा मुख्यमंत्र्यांकडे मंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द
12.45 वाजता
मुख्यमंत्र्याचं बोलावणं आल्यानंतर, नारायण राणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षा बंगल्यावर
12.15 वाजता
राजीनामा देऊन राज्याचा दौरा करणार, नारायण राणे यांनी मांडली भूमिका
11.25 वाजता
नारायण राणे यांचा शेवटचा सरकारी कार्यक्रम, वेबसाईट नारायण राणेंकडून लॉन्च
10.40 वाजता
नारायण राणेंना पक्षशिस्तीची माणिकरावांकडून आठवण
10.25 वाजता
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेंकडून नारायण राणेंची मनधरणी
10 वाजता
नारायण राणेंबाबत काँग्रेसचं वेट एंड वॉच
O9 वाजता
नारायण राणे राजीनामा देणार का? देतील तर मंत्रिपदाचा? की, पक्षाचा? याच्या चर्चा
नारायण राणे यांच्यासारख्या नेत्याची काँग्रेसला गरज आहे. नारायण राणेंचा राजीनामा स्वीकारण्यास मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी नकार दिला आहे.
(02.00 PM दुपारी)
नारायण राणे यांनी उद्योगमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. नारायण राणेंना मुख्यमंत्र्यांनी मनधरणीसाठी बोलावलं होतं. मात्र मुख्यमंत्री निवासस्थानीच नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना आपला राजीनामा सोपवला आहे.
नारायण राणे यानंतर पत्रकार परिषदही घेणार आहेत. राजीनामा देऊ नका, अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी नारायण राणे यांना केली असल्याचं सांगण्यात येत होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.