नवी मुंबईतही युती होणार, ६८-४३चा फॉर्म्युला ठरला

नवी मुंबईत शिवसेना भाजप युती अंतिम टप्प्यात आलीय. दोन्ही पक्षांमध्ये ६८-४३ च्या फॉर्मुल्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना ६८ जागा तर भाजप ४३ जागा लढवणार असल्याची माहिती मिळतेय. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच होणार असल्याचं समजतंय.

Updated: Apr 6, 2015, 10:41 AM IST
नवी मुंबईतही युती होणार, ६८-४३चा फॉर्म्युला ठरला title=

नवी मुंबई: नवी मुंबईत शिवसेना भाजप युती अंतिम टप्प्यात आलीय. दोन्ही पक्षांमध्ये ६८-४३ च्या फॉर्मुल्यावर एकमत झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शिवसेना ६८ जागा तर भाजप ४३ जागा लढवणार असल्याची माहिती मिळतेय. याबाबतची औपचारिक घोषणा लवकरच होणार असल्याचं समजतंय.

जागावाटपासंदर्भात शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे तर भाजपकडून आमदार संजय केळकर आणि मनोज कोटक चर्चा करतायत. युतीबाबतच्या अंतिम निर्णयाची घोषणा लवकर होणार असल्याचं बोललं जातंय. 

दरम्यान, नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत आता घटक पक्षांनीही भाजप आणि शिवसेनेवर नाराजी व्यक्त केलीय. जागावाटपांच्या चर्चेत समावेश करुन न घेतल्यामुळं या घटक पक्षांनी  शिवसेना-भाजपविरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय.

आरपीआयच्या गटानंही भाजप पुढे १५ जागांचा प्रस्ताव मांडलाय. मात्र त्यावर भाजपकडून वेळीच कोणताही निर्णय न आल्यास स्वबळावर निवडणूक लढवण्याचा इशारा आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सिद्राम ओहळ यांनी दिलाय.

रासपच्या नेत्यांनीही भाजपवर नाराजी व्यक्त करत स्वबळावर १८ जागा लढवणार असल्याचं सांगितलंय.
तर विनायक मेटेंच्या शिवसंग्रामच्या नेत्यांनीही नवी मुंबई महापालिकेच्या १० जागा लढवणार असल्याचं सांगितलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.