मुंबई : केंद्र सरकारकडून अद्याप महाराष्ट्राला कोणतीही मदत केली जात नसल्याचं दिसून येत आहे. कारण आज केंद्र सरकारने छत्तीसगड, ओरिसा आणि पश्चिम बंगाल या राज्यांना दुष्काळाचा सामना करण्यासाठी पॅकेजची मदत जाहीर केली आहे.
यापूर्वी कर्नाटकला मिळालं, पण अद्याप महाराष्ट्राला काहीही मिळालेलं नाही, केंद्राने छत्तीसगड ९२५ कोटी, तर ओरिसा ३८० कोटी रूपयांची मदत जाहीर केली आहे.
आम्ही आधीपासून सांगत होतो-अजित पवार
सरकारचे १०,५१२ कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी उपयोगाचे नसल्याचे आम्ही आधीपासूनच सांगत आहोत. त्यामुळेच कर्जमाफीची मागणी आम्ही लावून धरली, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.