www.24taas.com,मुंबई
रेल्वेने सुविधा देण्याच्या नावाखाली कर वाढ केली. त्यानंतर रेल्वेच्या भाड्यातही वाढ केली. त्यामुळे रेल्वेची तिकीट दरवाढ दोनवेळा झाली. आता तर रेल्वेने हाफ तिकीट बंद कण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वेने २२ जानेवारी २०१३ पासून तिकीट दरात वाढ केली. या वाढीमध्ये मुलांचेही तिकीट महागले आहे. त्यानुसार ३० किमीच्या पुढच्या टप्प्यानुसार दर वाढले आहेत. त्यामुळे ६ ते १२ वयोगटातील मुलांना फुल तिकीट घ्यावे लागणार आहे.
रेल्वेने नव्या नियमानुसार तिकिटांचे दर ५ , १० , १५ अशा पटीत ठेवण्यात आले असून त्याचप्रमाणे मुलांचे दर आकारण्यात आले आहेत. ६ ते १२ वयोगटातील मुलांना आता ३ रूपयां ऐवजी थेट ५ रूपये तिकीट घ्यावे लागणार आहे. आता ५, १०, १५ अशा पटीतच हाफचे फुल तिकीट मिळणार आहे. त्यामुळे चर्चगेट आणि मालाड या ३० किमीच्या दरम्यान १० रूपये मोजावे लागणार आहे. पूर्वी ३० किमीसाठी ८ रूपये मोजावे लागत होते. आता त्यामध्ये मुंबई शहर परिवहन योजनाचा (एमयूटीपी) ३ रूपये अधिभार लावला जात होता. त्यामुळे ११ रूपये तिकीट होत असे. मात्र, आता सरसकट १० रूपये तिकीट करण्यात आलेय.
लहान मुलांसाठीचे मूळ दर ४ रुपये आहे. त्यात 'एमयूटीपी' अधिभार ३ रुपये जोडण्यात आला आहे. मात्र पाचच्या पटीमुळे तिकिटाची रक्कम १० रुपये ठेवण्यात आले आहेत. यापूर्वी ३० किमीपर्यंत प्रौढांचे तिकीट १० आणि मुलांचे तिकीट ७ रुपये होते. नव्या वाढीमुळे चर्चगेट - बोरीवलीसाठी प्रौढांचे तिकीट १५ रुपये तर मुलांचे तिकीट १० रुपये झाले आहे.
रेल्वेचा प्रवास करताना ठराविक अंतरासाठी लहान मुलांसाठी ४ रूपये मोजावे लागत होते. त्यात ३ रूपये एमयूटीपी अधिभार लावून ७ रूपये तिकीट होत होते. आता हेच तिकीट १० रूपये करण्यात येणार आहे. मात्र, १० किमीच्या अंतरासाठी काहीही बदल करण्यात आलेला नाही. १० किमीसाठी ५ रूपयेच तिकीट भाडे आकारले जाणार आहे.
६० किमीसाठी पूर्वी तिकीटालाठी १० रूपये मोजावे लागत होते ते आता १६ रूपये मोजावे लागतील. तर ३५ किमीसाठी पूर्वी १० रूपये तर आता १५ रूपये, ३० किमीसाठी पूर्वी १० रूपये मोजावे लागत होते. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्याचप्रमाणे २० किमीसाठी पूर्वी १० रूपये मोजावे लागत होते. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तर १० किमीसाठी काहीही बदल करण्यात आलेला नाही.
दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांसाठी हाफ तिकीटाची सुट आहे. मात्र, या तिकीटाबाबत रेल्वेकडून अधिक स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे ज्येष्ठांच्या हाफ तिकीटाबाबत संभ्रम आहे.