मुंबई : रांगेत नोटा बदलवण्यासाठी आलेले लोक, पुन्हा पैसे बदलण्यासाठी येऊ नयेत, म्हणून त्यांच्या बोटाला शाई लावली जाणार आहे. मात्र बँकांकडे अजून अशी शाई आलेली नाही.
ही शाई फक्त निवडणूक अधिकाऱ्याच्या ताब्यात असते, तसेच कोणत्या हाताच्या बोटावर शाई लावायची, हे स्पष्ट नसल्याने गोंधळ उडाला आहे. एकदा शाई लागली आणि नंतर पैशांची गरज पडली तर काय करायचं हा देखील प्रश्न बँकांसमोर आहे.
राज्यात बहुतांश ठिकाणी पुढील आठवड्यानंतर नगरपालिकांची निवडणूक आहे, तेव्हा बोटाला शाई आणखी अडचणीत आणू शकतो.