आता भाषेला पर्याय व्यावसायिक शिक्षण

नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आता व्यवसाय शिक्षणासाठी एक भाषा ऑप्शनला टाकता येणार आहे... मात्र यामध्ये पहिली भाषा असलेला विषय बाद करता येणार नाही. 

Updated: Nov 6, 2015, 02:15 PM IST
आता भाषेला पर्याय व्यावसायिक शिक्षण title=

मुंबई : नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आता व्यवसाय शिक्षणासाठी एक भाषा ऑप्शनला टाकता येणार आहे... मात्र यामध्ये पहिली भाषा असलेला विषय बाद करता येणार नाही. 

इंग्रजी माध्यमाच्या शाळांना दुसऱ्या किंवा तिसऱ्या भाषेपैकी एका भाषेला व्यवसाय शिक्षणाचा पर्याय विद्यार्थ्यांना निवडता येईल. तर मराठीसह अन्य भाषांच्या शाळांना दुसऱ्या क्रमांकाची भाषा ऑप्शनला टाकून व्यावसायिक शिक्षण निवडता येईल. 

राज्य सरकारनं याबाबत नुकतंच एक परिपत्रक काढलंय. त्यानुसार विद्यार्थ्यांमध्ये व्यवसाय शिक्षणाची आवड निर्माण व्हावी यासाठी राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा योजनेअंतर्गत व्यवसाय शिक्षण हा विषय सुरु करण्याचे आदेश देण्यात आलेत. 

पहिल्या वर्षी शासकीय तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 350 शाळांमध्ये व्यवसाय शिक्षणाचे प्रत्येकी २ कोर्सेस सुरू करण्यात येणार आहेत... अन्य शाळांकडून माहिती मागवण्यात आली असून आगामी काळात या शाळांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.