सार्वजनिक शौचालयांची स्थिती सुधारण्यासाठी नवा फंडा

मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील सार्वजनिक शौचालयांमध्ये 'रेटींग मशीन' बसविण्यात येत आहेत.

Updated: Dec 9, 2016, 12:27 PM IST
सार्वजनिक शौचालयांची स्थिती सुधारण्यासाठी नवा फंडा title=

मुंबई : मुंबई महापालिकेच्या अखत्यारितील सार्वजनिक शौचालयांमध्ये 'रेटींग मशीन' बसविण्यात येत आहेत.

या मशीनवर शौचालय 'स्वच्छ आहे', 'ठीक आहे' किंवा 'अस्वच्छ आहे' असे तीन पर्याय असणार आहेत. शौचालयाचा वापर करणाऱ्याला शौचालयाबद्दलचं मत या तीन पर्यायांपुढील एक बटन दाबून नोंदविता येणार आहे.

उपलब्ध माहितीनुसार, देशातील हा या प्रकारचा पहिलाच प्रयोग असून यातील पहिले मशीन हे छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसजवळील भाटिया बागेच्यासमोर असणाऱ्या शौचालयात काही दिवसांपूर्वी बसवण्यात आलंय.

पहिल्या टप्प्यामध्ये महापालिकेच्या ५० सार्वजनिक शौचालयांमध्ये हे रेटींग मशीन्स बसविण्याचे प्रस्तावित आहे. एखाद्या सार्वजनिक शौचालयाबाबत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नकारात्मक मतं नोंदवल्यावर शौचालयाशी संबंधित स्वयंसेवी संस्थेवर महापालिकेद्वारे कारवाई करण्यात येईल.