अश्विनी कुमार पांडे/राकेश त्रिवेदी, झी मीडिया, मुंबई: स्वयंघोषित धर्मगुरू राधे माँने अखेर आपलं मौन सोडलंय. आपल्यावरील आरोप निराधार आणि खोटे असल्याचा दावा करत जिसका नाम है, वही बदनाम है अशी फिल्मी प्रतिक्रिया राधे माँने मुंबईत परतल्यावर दिली आहे.
जर मी चुकीची असती तर माझ्या भक्तांनी माझा विरोध केला असता, असं राधे माँ म्हणाली. माझ्यावरील सर्व आरोप खोटे असल्याचं म्हटलंय. मी कधी कुणाला काही मागितलं नाही. माझी तक्रार मनुष्याकडे नाही तर देवाकडे आहे, मी माझ्या सर्व भक्तांवर प्रेम करते आणि त्यांचा सन्मान करते, असंही त्या म्हणाल्या.
मुंबईत राहणाऱ्या एका तरुणीनं राधे माँविरोधात कौटुंबिक हिंसाचारांतर्गत तक्रार दाखल केली आहे. मात्र हे त्यांचं कौटुंबिक प्रकरण आहे, मला याविषयी काहीही माहिती नाही असं राधे माँने स्पष्ट केलं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.