मुंबई : रेल्वेचा अर्थसंकल्प उद्या २६ फेब्रुवारी रोजी संसदेमध्ये सादर होणार आहे. रेल्वे बजेटकडे तमाम मुंबईकरांचे डोळे लागले आहेत. मुंबईसाठी या बजेटमध्ये काय असणार याची अनेकांना उत्सुकता आहे. याच निम्मितानं पश्चिम रेल्वेनं प्रवास करणा-या मुंबईकरांच्या काय अपेक्षा आहेत आणि सध्या त्यांना रेल्वेच्या कुठल्या समस्या भेडसावत आहेत, याचा आम्ही आढावा घेतला आहे. त्यावरचा एक रिपोर्ट.
चर्चगेट पासून डहाणू पर्यंत पश्चिम रेल्वे विस्तारलीय. दिवसेंदिवस पश्चिम रेल्वेवरची प्रवासी संख्या वाढतच जातेय. जवळ पास 35 लाख प्रवासी पश्चिम रेल्वेनं दररोज प्रवास करताहेय. आणि याच लाखो प्रवाशांच्या रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून अनेक अपेक्षा आहेत.
रेल्वे प्रवाशांच्या अपेक्षा
-गोरेगाव पर्यंत हार्बर सुरु करावी
-MUTP 2 अंतर्गत सहावी लाईन कधी सुरु होणार
-विरार - डहाणू फेज 3 चं काम सुरु करावं
-DC टू AC Conversion होऊनही लोकल गाड्यांची गती धीमी
-15 डब्यांच्या लोकल सुरु करण्याच्या दृष्टीनं प्लेटफॉर्म लांबीचं काम जलद पूर्ण व्हावं
-बंबार्डिअर कंपनीच्या नव्या गाड्या यंदा तरी सुरु होतील का ?
-सर्व स्टेशनवरचे जुने इंडिकेटर काढून नवे LED इंडिकेटर बसवावे
-कांदिवली चर्चगेट लोकल सुरु करावी
-अंधेरी - विरार फे-या गर्दीच्या वेळी वाढवाव्यात
-बोरीवली - डहाणू ट्रेन 5 मिनिटांच्या अंतरानी असावी
-वांद्रे स्टेशन आणि वांद्रे टर्मिनसमध्ये रोड ओवर ब्रिज सुरु करावा
रेल्वे अर्थसंकल्पामध्ये अनेक घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात त्या खूप कमी सत्यात उतरतात. या आधीही घोषणा झालेले अनेक प्रकल्प आज निधी अभावी अपूर्णच आहेत. यामुळेच मुंबईकरांचे हाल अजूनही सुरुच आहेत. निदान आता तरी असं होऊ नये अशीच अपेक्षा रेल्वे प्रवासी संघटनांनी वर्तवलीय.
रेल्वे बजेट मध्ये ठाणे स्टेशनाला काही तरी विशेष तरतुदी अशी अपेक्षा प्रत्येक वेळी ठाणेकर रेल्वे प्रवासी बाळगतो. मात्र प्रत्येक वर्षी त्याच्या पदरी निराशाच पडते. यंदाचं वर्षही त्याला अपवाद नाही. ठाणे स्टेशनवरून कर्जत, कसारासाठी गाड्या सुटाव्यात. प्लॅटफॉर्मची उंची वाढवावी. महिलांसाठी खास लोकल द्याव्या. महिलांचे डबे वाढवावेत. स्टेशनवरच्या सुविधा वाढवणे, खास करून महिलांसाठी शौचालय असणे या आणि इतरही मागण्यांचा यात समावेश आहे.
रेल्वे म्हणजे मुंबईकरांची लाइफ लाईन आहे. हीच लाइफ लाईन अधिक सुखकर व्हावी यासाठी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून सगळ्या मुंबईकरांच्या भरीव अपेक्षा आहेत, त्यामुळे उद्याच्या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागलेय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.