www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईसह उपनगरांत रात्रीपासून जोरदार पाऊस पडत आहे. आज रविवार असल्याने त्याचा फटका प्रवाशांना बसला नाही. मात्र, शहरातील सकल भागात पाणी तुंबल्याने महापालिकेच्या स्वच्छतेचा बोजवारा उडाल्याचे दिसून येत आहे.
ठाणे आणि नवीमुंबईत चांगला पाऊस पडत आहे. या पावसाचा परिणाम मुंबई लोकवर दिसून आलाय. मध्यरेल्वेच्या गाड्या उशिरा तर मध्य रेल्वेच्या गाड्या १० मिनिटे उशिराने धावत आहेत.
मुंबईतील चाकरमान्यांना पावसाचा कोणताही त्रास झाला नाही. ठाणे, नवी मुंबई पाऊस बसरत आहे. शनिवारी रात्री आलेल्या पावसामुळे रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झालेला दिसून आलाय.
मुंबईत मान्सूनच्या पावसाचं आगमन झाल्याने त्याचा पहिलाच फटका मुंबईकरांना झालाय. हिंदमाता, चेंबूर परिसरात पाणी साचलं आहे. या पावसाने महापालिकेच्या नालेसफाई कामाचा पोलखोल झालाय.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.