www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत गेली दोन ते तीन दिवस थंडी होती. मात्र, आज सकाळी मुंबईसह उपनगरात पावसाच्या हलक्या सरी पडल्यात. ढगाळ वातावरण आणि पाऊस यामुळे मुंबईतील थंडी गायब झाली आहे.
मुंबई आणि उपनगरात आज सकाळी पावसाचा शिडकावा झाला. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत ढगाळ वातावरण होतं. दोन दिवस सूर्यदर्शन झालं नव्हतं. त्यातच पहाटे मुंबई शहरासह उपनगरं आणि कल्याण डोंबिवली परिसरात पावसाचा शिडकावा झाला. मात्र यामुळे थंडी पळाली होती. काल पहाटेच्या गारठ्यानंतर मुंबईकरांनी आज दमट हवामान अनुभवलं. वातावरणात झपाट्याने होणा-या या बदलांमुळे मुंबईकरांनो आरोग्य़ सांभाळा.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईचा पारा खालावला आहे. त्यात पाऊस बरसल्याने पुन्हा थंडी वाढण्याची शक्यता आहे. मात्र पावसाच्या या हलक्या सरींचा फटका नागरिकांना बसला आहे. पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने अनेक ठिकांणी गाड्या घसरल्यात.
वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, इस्टर्न एक्स्प्रेस हायवे, लालबाग, सायन, मुंबई सेंट्रल या ठिकाणी काही किरकोळ घटना घडल्या आहेत. त्यामुळे वाहनं जपून चालवण्याचं आवाहन ट्राफिक पोलिसांनी मुंबईकरांना केलं आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.