मुंबई : ‘महाराष्ट्राला स्वातंत्र्य नको, स्वायत्तता द्या’ असं म्हणत राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केंद्र सरकारला इशारा दिलाय.
‘हो, हे शक्य आहे’ म्हणत मनसेची ब्ल्यू प्रिंट अखेर सात वर्षांनी प्रकाशित झाली. सगळे आपापला विचार करत असताना आपण महाराष्ट्राचा विचार करुया, असा टोला लगावत राज ठाकरेंनी ही ब्ल्यू प्रिंट महाराष्ट्रासमोर मांडलीय.
विकासाचा आराखडा असल्याचा दावा करण्यात आलेल्या या ब्ल्यू प्रिंटमध्ये कृषी, शिक्षण आणि उद्योग क्षेत्रासाठी वेगवेगळी धोरणं आखण्यात आलीयत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सत्तेचा पहिला दिवस हा महाराष्ट्रातल्या कुठल्याही नवीन झोपडपट्ट्यांचा शेवटचा दिवस असेल, असा उल्लेख ब्ल्यू प्रिंटमध्ये करण्यात आलाय.
त्याचबरोबर महाराष्ट्रातल्याच मुलांना रोजगार उपलब्ध व्हायला हवा… महिलांच्या नावे घर खरेदी करण्यात आलं तर तिला मुद्रांक शुल्क माफ करण्यात येईल… 10 कोटींच्या कुठल्याही रस्त्यांच्या कामांना टोल लागणार नाही... टोलवरचा सगळा कारभार कॅशलेस करण्यात येईल, यांसह विकासाचे अनेक आराखडे या ब्ल्यू प्रिंटमध्ये मांडण्यात आलेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.