जाणून घ्या कोणत्या ५ कारणांमुळे सुटला सलमान खान

 मुंबई हायकोर्टाने गुरूवारी बॉलिवूड स्टार सुपरस्टार सलमान खान याला २००२ च्या हिट अँड रन प्रकरणातील सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरविण्यात आले होते. पाच वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

Updated: Dec 10, 2015, 04:41 PM IST
जाणून घ्या कोणत्या ५ कारणांमुळे सुटला सलमान खान title=

मुंबई  :  मुंबई हायकोर्टाने गुरूवारी बॉलिवूड स्टार सुपरस्टार सलमान खान याला २००२ च्या हिट अँड रन प्रकरणातील सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त केले आहे. या प्रकरणात सत्र न्यायालयाने त्याला दोषी ठरविण्यात आले होते. पाच वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. 

हा निकाल ऐकत असताना सलमान खानच्या डोळ्यात पाणी होते. पण तुम्हांला माहित आहे का या पाच कारणांमुळे सलमान खान निर्दोष सुटला... 

१) मुंबई हायकोर्टाने सलमान विरोधात सादर केलेले पुरावे सक्षम आणि संपूर्ण मानले नाही. कोर्ट म्हटले की, या पुराव्यांच्या आधारावर सलमानला दोषी ठरविण्यात येणार नाही. 

२) कोर्टात सुनावणी दरम्यान सांगितले की अपघात झाला त्यावेळी फुटपाथवर झोपलेल्या नुरूल्ला याचा मृत्यू अपघातात झाला होता. सलमान खानची कार क्रेनने उचलत असताना झाला नव्हता. कोर्टाने सांगितले की सलमानने कोणाला मारले नाही. 

३) हिट अँड रन प्रकरणाची सुनावणी करणारे न्यायमूर्ती ए. आर. जोशी यांनी म्हटले की, या प्रकरणाची सुनावणी चुकीच्या पद्धतीने करण्यात आली. या प्रकरणातील सुनावणी खूप ढिसाळपणे झाल्याचेही मत न्या. जोशी यांनी मांडले. 

४) या प्रकरणात सरकारी पक्षाने कोर्टात सलमान खान विरोधात लावण्यात आलेले आरोप योग्य पद्धतीने सिद्ध केले नाही. ते अपयशी ठरले याचा फायदा सलमानला झाला. 

५) कोर्टाने सुनावणी दरम्यान दस्ताऐवजातील नोंदविण्यात आलेला कॉन्स्टेबल रवींद्र पाटील याची साक्ष ग्राह्य धरण्यास नकार दिला. कोर्ट म्हटले की या साक्षीवर भरवसा ठेवता येणार नाही. रविंद्र पाटील हे या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार होते. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.