सेना-भाजप युतीमध्ये चर्चेचं घोडं पुन्हा अडलं?

सेना-भाजप युतीमध्ये चर्चेचं घोडं पुन्हा एकदा अडल्याचं चित्र आहे. शुक्रवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी एक पाऊलही पुढे टाकलेलं नाही. 

Updated: Nov 30, 2014, 03:42 PM IST
सेना-भाजप युतीमध्ये चर्चेचं घोडं पुन्हा अडलं? title=

मुंबई: सेना-भाजप युतीमध्ये चर्चेचं घोडं पुन्हा एकदा अडल्याचं चित्र आहे. शुक्रवारी मातोश्रीवर झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांनी एक पाऊलही पुढे टाकलेलं नाही. 

काल दिवसभर दोन्ही पक्षांमध्ये चर्चा झाली नाही. खास चर्चेसाठी आलेले भाजप नेते धर्मेंद्र प्रधान पुन्हा दिल्लीला गेल्याचं समजतंय. त्यामुळं आता युतीबाबत चर्चा होणार की नाही? असा प्रश्न आहे. 

चर्चा पूर्ण होईपर्यंत दिल्लीला जाणार नसल्याचं प्रधान यांनी म्हटलं होतं. आता ते परतले असल्यास चर्चा होणारच नाही, असा त्याचा अर्थ घ्यायचा का?, असा प्रश्न आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.