Update - शरद पवार सपत्निक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दुसरा स्मृतीदिन. बरोबर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बाळासाहेबांची मृत्यूशी झुंज संपली आणि तमाम महाराष्ट्राच्या काळजात चर्र झालं.. आज शिवाजी पार्कावर येऊन आपल्या या लाडक्या नेत्याप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी लाखो शिवसैनिकांची पाउलं दादरकडे वळणार आहेत.

Updated: Feb 2, 2015, 04:04 PM IST
Update - शरद पवार सपत्निक बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी title=

07.15 PM - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन आदरांजली वाहिली. 

03.15 PM - दुसरीकडे दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या कायमस्वरुपी स्मारकासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलंय. मुख्यमंत्र्यांनी शिवाजी पार्कवरील स्मृतीस्थळावर जाऊन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. विनोद तावडे, पंकजा मुंडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित आदी मंत्री आणि भाजप नेते यावेळी त्यांच्यासोबत स्मृतीला अभिवादन केले...

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती नेमण्यात येणार असून, शिवसेना नेत्यांशी चर्चा करून स्मारक उभारण्यात येईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय... दरम्यान, मुख्यमंत्र्यांचं स्मृतीस्थळावर आगमन झाल्यानंतर शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.

02.58  PM मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी पोहोचले

02.54 PM भाजपा नेते विनोद तावडेही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाणार आहेत

02.44 PM ही राजकीय नव्हे, कौटुंबिक भेट आहे, महाराष्ट्राच्या भल्यासाठी एकत्र आले तर आनंदच - शिवसेना नेते एकनाथ शिंदे

01:40PM- राजकारणापेक्षा रक्ताचं नातं ठरलं घट्ट... राज ठाकरेंनी स्मृतीस्थळावर श्रद्धांजली वाहून ते परतले... 

01:33PM- राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा सुरू... शिवतीर्थावर येणाऱ्या शिवसैनिकांसोबत दोघंही बोलतायेत... 

01:15PM - मनसे अध्यक्ष राज ठाकरे प्रथमच स्मृतीस्थळावर जावून आदरांजली वाहणार
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृतीदिन
प्रथम स्मृतीदिनी राज ठाकरेंनी स्मृतीस्थळावर जाणं टाळलं होतं

01:06PM - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री विनोद तावडे शिवाजी पार्कवर जाणार, शिवसेनाप्रमुखांचा वाहणार श्रद्धांजली

10:48AM - भाजपा आणि शिवसेनेमधील दुरावा तात्पुरता, भविष्यात दोन्ही पक्ष एकत्र येतील - शिवसेनेेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी

10:45AM - उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना श्रद्धांजली अर्पण केली, शिवसेनेचे खासदार आणि आमदारही स्मृतिस्थळावर दाखल.

10:43AM - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले.

09:36AM - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे बाळासाहेबांना श्रद्धांजली वाहिली.

09:09AM - मनोहर जोशी, नीलम गो-हे आदी नेते बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर. 

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दुसरा स्मृतीदिन. बरोबर दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी बाळासाहेबांची मृत्यूशी झुंज संपली आणि तमाम महाराष्ट्राच्या काळजात चर्र झालं.. आज शिवाजी पार्कावर येऊन आपल्या या लाडक्या नेत्याप्रती आदरांजली व्यक्त करण्यासाठी लाखो शिवसैनिकांची पाउलं दादरकडे वळणार आहेत.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेचे झाडून सर्व ज्येष्ठ नेते तिथं येतीलच, पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यातले आणि केंद्रातले भाजपचे मंत्री तसंच काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते, शिवाजी पार्कावर बाळासाहेबांच्या समाधीस्थळी येण्याची शक्यता आहे.

लाखोंच्या संख्येत शिवसैनिक शिवाजी पार्कवर येण्याची शक्यता असल्यानं, तिथली सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आलीय. तर शिवाजी पार्ककडे जाण्याची वाहतूकही वळविण्यात आलीय.   

दरम्यान, काल उद्धव ठाकरे यांनी संध्याकाळी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट दिली. बाळासाहेबांच्या दुसऱ्या स्मृतीदिनाच्या तयारीचा आढावा त्यांनी घेतला. स्मृतीस्थळावर संध्याकाळपासूनच शिवसैनिकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.