राजू शेट्टींवर शिवसेनेचा 'सामना'तून हल्लाबोल

शिवसेनेने एकामागून आपल्या जुन्या मित्र पक्षांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आधी आठवले, काल जानकर आणि आज राजू शेट्टीवर शिवसेनेनं हल्लाबोल केला आहे. 

Updated: Oct 2, 2014, 01:25 PM IST
राजू शेट्टींवर शिवसेनेचा 'सामना'तून हल्लाबोल title=

मुंबई : शिवसेनेने एकामागून आपल्या जुन्या मित्र पक्षांवर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून आधी आठवले, काल जानकर आणि आज राजू शेट्टीवर शिवसेनेनं हल्लाबोल केला आहे.

राजू शेट्टींचा सल्ला. उंदराच्या बिळातील चार शेंगा या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखातून शिवसेनेनं शेट्टींचा समाचार घेतलाय. एनडीएमधून बाहेर न पडण्याच्या शेट्टी यांनी शिवसेनेला दिलेल्या सल्ल्याची खिल्ली उडवण्यात आली आहे. एकीकडे एनडीएवर टीका करता आणि दुसरीकडे शिवसेनेला सल्ला देता हे काय गौडबंगाल आहे, असा सवाल अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

आठवले, जानकर, शेट्टी, मेटे यांची यांची मजबुरी असल्याने भाजपची साथ धरावी लागल्याचं या अग्रलेखात नमूद करण्यात आले आहे. मिळतील त्या चार शेंगा आपल्या बिळात नेऊन ठेवणा-या उंदरासारखी या मंडळींची मनोवृत्ती झालीय अशी टीका सामनातून करण्यात आलीय.. याआधी सोमवारी रामदास आठवले आणि काल राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांना टार्गेट करण्यात आलं होतं. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.