'शुक्रिया पाकिस्तान' म्हणत सेनेनं मानले पाकिस्तानचे आभार

पाकिस्ताननं आपल्याला दहशतवादी म्हणत बंदीची मागणी करावी, हे आपल्यासाठी भूषणावहच असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. 'सामना' या मुखपत्राच्या संपादकीय लेखात शिवसेनेनं पाकिस्तानला शुक्रीया म्हणत आभार मानलेत.

Updated: Nov 2, 2015, 05:04 PM IST
'शुक्रिया पाकिस्तान' म्हणत सेनेनं मानले पाकिस्तानचे आभार  title=

मुंबई : पाकिस्ताननं आपल्याला दहशतवादी म्हणत बंदीची मागणी करावी, हे आपल्यासाठी भूषणावहच असल्याचं शिवसेनेनं म्हटलंय. 'सामना' या मुखपत्राच्या संपादकीय लेखात शिवसेनेनं पाकिस्तानला शुक्रीया म्हणत आभार मानलेत.

अधिक वाचा - परवेझ मुशर्रफनं केली बाळासाहेब ठाकरेंची तुलना लादेन, हाफिज सईदसोबत!

काही दिवसांपूर्वी, पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेज मुशर्रफ यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची तुलना २६/११च्या हल्ल्याचा मास्टरमांईड हाफिज सईदशी केली होती. तसंच पाकिस्तानातील पंजाब प्रांतच्या विधानसभेत शिवसेनेच्या पीसीबीचे अध्यक्ष शहरियार खान यांची बीसीसीआय सोबतची बैठक उधळून लावण्याच्या घटनेचा केला होता. तसंच नवाझ शरीफ सरकारनं आंतरराष्ट्रीय समुदायाकडे शिवसेनेला दहशतवादी संघटना ठरवत या संघटनेवर बंदी आणण्याची मागणी केलीय. 

यावर, उपरोधिक अंदाजात शिवसेनेनं पाकिस्तानवर तोंडसुख घेतलंय. काय म्हटलंय या लेखात पाहुयात...  
पाकड्या अतिरेक्यांच्या हिटलिस्टवर असणे ही आपल्यासाठी गौरवाची बाब असल्याचे शिवसेनाप्रमुख अभिमानाने सांगत. त्याच शिवसेनेचा वारसा आम्ही आजही सांगत आहोत. खासकरून पाकड्यांच्या बाबतीत शिवसेना कोणतीही तडजोड करणार नाही. म्हणूनच शिवसेनेच्या बाबतीत पाकिस्तानात जे घडते आहे ते आमच्यासाठी अभिमानाचीच बाब आहे.

आणखी वाचा - व्हिडिओ : अमेरिकेत सार्वजनिकरित्या पाकिस्तानची 'छि...थू'

गुलाम अलीचे ‘पाकडे’ पाय आम्ही महाराष्ट्रात पडू दिले नाहीत. कश्मीरातील फुटीरतावाद्यांना हिंदुस्थानविरोधी ताकद देणार्‍या कसुरीच्या विरोधात शिवसेनेने ‘आवाज’ दिला. पाकड्या क्रिकेटपटूंचा दौरा शिवसेनेच्या दहशतीने रद्द झाला, हे सत्यच आहे व हे सर्व केल्याबद्दल आम्हाला खंत, खेद वा अपराधी असल्याचे वाटत नाही. कारण पाकड्यांना रोखण्याची हिंमत फक्त शिवसेनेत आहे. 

अधिक वाचा - शिवसेनेला दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी
 
हिंदुस्थानवर अणुबॉम्ब टाकण्याची भाषा करणार्‍या पाकड्यांचे ‘लाड’ ज्यांना करायचेत त्यांना करू द्यात, पण त्या पापात शिवसेना कधीच सहभागी होणार नाही व त्यामुळेच पाकड्यांनी शिवसेनेच्या विरोधात जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. पाकिस्तानमधील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या ‘पीपीपी’ने शिवसेनेस दहशतवादी संघटना घोषित करण्याची मागणी केलीच आहे, पण आता प्रत्यक्ष नवाज शरीफ सरकारनेही शिवसेनेवर बंदीची मागणी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे करून शिवसेनेस ‘महावीर चक्र’ प्रदान केले आहे.

शुक्रिया पाकिस्तान! आम्हाला पाकिस्तान शत्रू मानत आहे, त्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.