मुंबई: मेट्रो ची कारशेड आरेमध्ये करण्यावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. पण आता पुन्हा एकदा हा वाद निर्माण व्हायची शक्यता आहे.
मेट्रोची कारशेड आरे कॉलनीतच होणार अशी माहिती पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली आहे. पण आरे मध्ये कारशेड उभारायला शिवसेनेनं विरोध केला आहे. जनभावनेचा विचार करण्याचं आवाहन शिवसेनेनं केलं आहे.
आरे मध्ये कारशेड उभारायला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही अनुकूल आहेत. कारशेडची रचना बदलल्यामुळं 350 झाडंच तोडली जाणार आहेत. पूर्वी आरेमधील तब्बल दोन हजार झालं तोडली जाणार होती. राष्ट्रीय हरित लवादानं या प्रस्तावाला मंजुरी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे.
350 झाडं वाचवण्यासाठी 1500 कोटी जास्त खर्च येणार आहे. त्यामुळं 350 झाडं वाचवण्यासाठी 1500 कोटी रूपये जास्त खर्च करायचे की साडे तीन हजार झाडं लावायची याचा विचार करावा लागेल असंही मुख्यंत्र्यांनी नमूद केलं आहे.