मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत मिळाले आहेत. हिवाळी अधिवेशानापू्र्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचा मार्ग मोकळा झालाय. भाजपच्या कोर कमिटीने विस्ताराला हिरवा कंदील दिलाय.
भाजपच्या कोर कमिटी बैठकीत सर्व विभागातील मंत्र्यांनी त्या त्या विभागातील नावांचा तसा प्रस्ताव पुढे ठेवला आहे. कोकण विभागातून विनोद तावडे यांनी तर मराठवाड्यातून पंकजा मुंडे यांनी तसेच पश्चिम महाराष्ट्रातून चंद्रकांत पाटील, विदर्भातून सुधीर मुनगंटीवार, उत्तर महाराष्ट्रातून एकनाथ खडसे यांनी नावे सूचवली आहेत. त्यामुळे कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.
प्रत्येक विभागाला प्रतिनिधीत्व देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. जरी विभागवाद नावे पुढे आली तरी यादी अंतिम करण्यासाठी मुख्यमंत्री दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांची अंतिम चर्चा करुन निर्णय घेणार आहेत.
दरम्यान, भाजपच्या मित्रपक्षांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार आहे. चारही घटक पक्षांना संधी देण्यात येणार आहे. यात विनायक मेटे यांच्या नावाची चर्चा आहे. तर शिवसेनेला दोन राज्यमंत्री पदेच मिळणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.