राज्यावर कर्जाचा बोजा, देशात क्रमांक एकवर महाराष्ट्र

देशातलं सर्वात जास्त औद्योगिक राज्य म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाराष्ट्रावर सर्वाधिक कर्जबाजारी राज्याचा शिक्का बसलाय. त्याचबरोबर प्रत्येक माणसाच्या डोक्यावर हे कर्ज आहे.

Updated: Nov 26, 2015, 10:56 PM IST
राज्यावर कर्जाचा बोजा, देशात क्रमांक एकवर महाराष्ट्र title=

मुंबई : देशातलं सर्वात जास्त औद्योगिक राज्य म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या महाराष्ट्रावर सर्वाधिक कर्जबाजारी राज्याचा शिक्का बसलाय. त्याचबरोबर प्रत्येक माणसाच्या डोक्यावर हे कर्ज आहे.

रिझर्व्ह बँकेनं नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसावर २९ हजार ६६१ रुपये कर्ज आहे. राज्य सरकारच्या डोक्यावर तब्बल ३ लाख ३८ हजार ७३० कोटी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे.

रिझर्व्ह बँकेच्या आकेडवारीनुसार उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर तर पश्चिम बंगाल तिसऱ्या क्रमांकाचं कर्जबाजारी राज्य आहे. महाराष्ट्राचं शेजारी राज्य असणाऱ्या गुजरातचा कर्जबाजारीपणाच्या बाबतीत पाचव्या क्रमांकावर आहे. भलं मोठं कर्ज असलं, तरी नागरी सुविधांची मुंबई आणि महाराष्ट्रात बोंब आहेच.

देशातील पहिली पाच कर्जबाजारी राष्ट्रे
महाराष्ट्र
पश्चिम बंगाल
उत्तर प्रदेश
आंध्र प्रदेश
गुजरात

पाहा किती आहे कर्जाचा बोजा

महाराष्ट्र २.५३ लाख कोटी
उत्तर प्रदेश रुपये २,४४५.१ अब्ज
पश्चिम बंगाल रुपये २,११५.० अब्ज
आंध्र प्रदेश रुपये १.५३८ अब्ज,
गुजरात १५२८.९
तामिळनाडू रुपये १.३२५ अब्ज
कर्नाटक रुपये १.०१७ अब्ज.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.