यंदा बळीराजा सुखावणार, देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस

स्कामेट या खासगी संस्थे पाठोपाठ सरकारी हवामान विभागाने ही बळीराजाला सुखद बातमी दिली आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. मात्र चालू वर्षात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

Updated: Apr 12, 2016, 08:36 PM IST
यंदा बळीराजा सुखावणार, देशभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस title=

मुंबई : स्कामेट या खासगी संस्थे पाठोपाठ सरकारी हवामान विभागाने ही बळीराजाला सुखद बातमी दिली आहे. गेल्या वर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला होता. मात्र चालू वर्षात चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.
 
गेल्या २ वर्षापासून राज्यावर दुष्काळाचं सावट आहे. विदर्भ, मराठवाड्यालाही गतवर्षीपेक्षा अधिक पाऊस पडणार आहे. जुलै ते सप्टेंबर या काळात अंदाजे ७० टक्के पाऊस पडणार असून देशात सरासरीपेक्षा १०५ टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तवला आहे.