www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
चौदा विद्या चौसष्ठ कलांचा अधिपती असलेल्या गणपती बाप्पाचा माघ महिन्यातील जयंती उत्सव आजपासून सुरू होतोय.
माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील विनायकी चतुर्थी श्रीगणेशजयंती म्हणून ओळखली जातो.
हा उत्सव माघी गणेशोत्सव म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी झालीये.
माघी गणेशोत्सवात गणपतीला तीळाच्या लाडवांचा नैवैद्य दाखवण्याची प्रथा आहे.
माघी गणेश जयंती ही तीलकुंद चतुर्थी म्हणूनही ओळखली जाते. माघी गणेश जयंतीच्या निमित्तानं आज ठिक ठिकाणी गणेशाची प्रतिष्ठापना होत आहे.
• इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
• झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.