मुंबई : टोल कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे. नोटबंदीचा निर्णयानंतर केंद्रप्रणे राज्यातही टोल नाक्यांवर टोल वसुली बंद होती.
राज्यातील 65 टोल नाक्यांवर टोल वसुली बंद होती. राज्यात दिवसाला सरासरी साडे सहा कोटी टोलची वसुली होते. तीन आठवडे टोल वसुली बंद असल्याने कंत्राटदारांना साधारण 125 कोटी रुपयांचा नुकसान झाल्याचा अंदाज
कंत्राटदारांनी त्यांना झालेल्या नुकसान भरपाईची मागणी राज्य सरकारकडे केली आहे.
पण कंत्राटदारांना पैसे देण्याऐवजी टोल वसुलीची काल मर्यादा वाढवून देण्याचा विचार सरकार करत आहे. केंद्राने टोल वसुली बंद केल्यानंतर आणि त्याची मर्यादा दोन डिसेंम्बरपर्यंत केली. त्याच पावलावर पाऊल टाकत राज्याने पण टोल वसुली बंद निर्णय घेतला होता.