मुंबई : राष्ट्रीय महामार्गांवर 1 डिसेंबरपर्यंत टोलमाफी देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्यानंतर आता राज्यातही २ डिसेंबर मध्यरात्रीपर्यंत टोल माफी करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
नोटाबंदीच्या निर्णय़ामुळं सर्वदूर सुट्टे पैशांची अडचण झाली आहे. या निर्णयाला पंधरा दिवस झाले असले तरी देखील याची तीव्रता कमी झालेली नाही. त्यामुळं राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफीची मुदत आणखी आठ दिवसांनी वाढवण्यात आली आहे. केंद्राने टोल माफीचा निर्णय घेतला की आम्हीही त्याआधारे घेऊन अशी माहिती सकाळी चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. त्यानुसार ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
महामार्गांवरच्या टोलबंदीची मुदत आज मध्यरात्री संपणार होती. त्याआधी 18 नोव्हेंबरपर्यंत टोलमाफी देण्यात आली होती. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळं आता राज्य सरकारही राज्यातल्या अखत्यारीतल्या मार्गांवर टोलमाफी करण्यात आली आहे.