अखेर व्यापाऱ्यांचा संप मागे

मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर व्यापा-यांनी संप मागे घेत असल्याचं जाहिर केलं. पुणे पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाण्याच्या व्यापा-यांनी संप मागे घेत असल्याचं सांगितलं.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: May 20, 2013, 11:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनंतर व्यापा-यांनी संप मागे घेत असल्याचं जाहिर केलं. पुणे पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, ठाण्याच्या व्यापा-यांनी संप मागे घेत असल्याचं सांगितलं.
मुख्यमंत्र्यांवर आपल्याला विश्वास असल्याचं फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ पिंपरी चिंचवडचे मानद सचिव गोविंद पानसरे यांनी म्हटलंय. उद्या म्हणजेच २१ मे पासून व्यापार पूर्ववत सुरू होईल असंही त्यांनी जाहीर केलं. यावेळी नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, व्यापारी संघटनांचे अधिकारी उपस्थित होते. एलबीटी साठी नोंदणीची मर्यादा वाढणे, आयातीवरील कर, दंडाची तरतूद याबाबत कायद्यात आणि नियमात आवश्यक तिथे बदल करणे याबाबत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचं या संघटनांच्या पदाधिका-यांनी सांगिलत.
यावेळी आमदार मोहन जोशी, संघटनांचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, गजानन बाबर, गोविंद पानसरे उपस्थित होते. दरम्यान याबाबत दुपारी मुख्य सचिवांशीही व्यापारी संघटनांची बैठक झाली होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.