मुंबई: आता मुंबईतील एक धक्कादायक बातमी... वडाळा रेल्वे स्थानकावर अगदी वर्दळीच्या वेळी सोनसाखळीचोरानं प्लॅटफार्मवर असलेल्या एका महिलेची सोनसाखली चोरली आणि रेल्वेट्रॅकमध्ये उडी घेऊन तिथून पोबारा केला.
मात्र त्याची ही चोरी प्लॅटफॉर्मवरील CCTVमध्ये कैद झाली. 12 ऑगस्ट रोजी घडलेल्या या घटनेचं CCTV फूटेज झी मीडियाच्या हाती लागलंय. CCTV फूटेजच्या आधारे रेल्वे पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी सुरू आहे.
ही महिला ट्रेनची वाट पहात असताना एक तरूण तिथं चालत आला आणि डोळ्याचे पाते लवते ना लवते तोच त्यानं त्या महिलेच्या गळ्यातील चेन खेचत प्लॅटफॉर्मवरून उडी मारली.
भर दिवसा आणि वर्दळीच्या वेळी घडलेल्या या घटनेमुळं महिला रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.