www.24taas.com, झी मीडिया, नागपूर
नागपुरात उन्हाचा प्रकोप वाढतच जातोय. उष्माघाताचे आणखी ७ बळी गेले आहेत. उष्माघाताचे एकूण बळींची संख्या आता 19 झाली आहे.
मागील 7 वर्षांचा इतिहास पाहता यंदाच्या उन्हाळ्यात उष्माघातामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे.
नागपूरचे तापमान ४७.३ अंश सेल्सियस असताना शहराच्या वेगवेगळ्या भागात पोलिसांना आणखी ७ मृतदेह आढळले आहेत.
२ दिवसात नागपुरात उष्माघाताने अक्षरशा कहर केला आहे. मृत्युमुखी पडलेल्या सर्व ७ जणांची ओळख पटली आहे.
बाबुलाल, रामभरोसे गुप्ता, रामलाल चौरे, विजय विरुडकर, देवनाथ शेंदरे, प्रकाश नंदनवार आणि नंदकुमार प्रधान अशी मृतांची नावं आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.