www.24taas.com, येवला
दुष्काळ फक्त शेतक-यांच्याच मुळावर उठला नसून, दुष्काळामुळं जंगलचे राजे म्हणवले जाणारे आदिवासी बांधवही देशोधडीला लागल्याचं खळबळजनक माहिती समोर आलीये. नाशिक जिल्ह्यातल्या येवल्यातल्या आदिवासींवर भीक मागण्याची वेळ आलीये.
दुष्काळामुळं येवल्यातील तळवाडे, शिवाजीनगर आणि ममदापूर भागात रोजगार राहिलेला नाही. रोजगाराचं दुसरं साधन नाही. त्यामुळं इथले आदिवासी आता भिक्षेकरी झालेत. भीक मागण्यासाठी इथले आदिवासी थेट औरंगाबादपर्यंत जातात. शहरात दारोदार मागून आणलेला शिळ्या भाकरीचे तुकडे घरासमोर वाळत घालतात. आणि याच तुकड्यांवर पूर्ण कुटुंब गुजराण करीत असल्याचं चित्र आहे.
शिळ्या भाकर तुकड्यांमुळं प्रसंगी विषबाधाही होण्याचा धोका आहे. मात्र पोटाची खळगी भरण्यासाठी आदिवासी ही जोखीमही स्वीकारतायेत. दुष्काळग्रस्तांसाठी फक्त टँकरची गरज आहेच, शिवाय दुष्काळावर सर्वांगिण उपाययोजनांची गरज निर्माण झालीये.