www.24taas.com, झी मीडिया, बुलढाणा
विविध मागण्यांसाठी बुलडाण्यातल्या शेतकऱ्यांनी ठेचा भाकर आंदोलन केलं. उत्पादन खर्चाच्या तुलनेत सोयाबीनला सरकारकडून दिला जाणार हमीभाव अत्यंत कमी आहे.
सोयाबीनला पाच हजार रुपये, कापसाला ८ हजार रुपये हमीभाव देण्यात यावा तसंच सानुग्रह अनुदान आणि विम्याचे पैसे शेतक-यांना दिवाळीपूर्वीच मिळायला हवे होते... मात्र दिवाळी आल्यानंतरही ते शेतक-यांना मिळालेले नाहीत. त्यामुळं बुलडाण्यातले शेतकरी अडचणीत सापडलेत... त्यात भर म्हणजे सरकारने जाहीर केल्यानुसार रेशनची साखर अद्यापही स्वस्त धान्य दुकानात उपलब्ध झाली नसल्याने शेतकरी आणि शेत मजुरांसाठी ही दिवाळी कडू ठरलीय.
त्यामुळं युवा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेकडो कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनच्या आवारात ठेचा भाकर खावून सरकारचा निषेध केलाय. मागण्या मान्य झाल्या नाही तर तीव्र आंदोलनचा इशारा यावेळी देण्यात आला..
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.