www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिक जिल्ह्यातल्या कळवण तालुक्यातल्या २० गावांची सध्या झोप उडालीय. या गावांना भूकंपाचे धक्के बसतायत.पण हे नक्की कशामुळे होतंय, त्याचा शोध लागलेला नाही. एक रिपोर्ट.
नाशिक जिल्ह्यातल्या कळवणपासून काही अंतरावर असलेलं हे बोरदहीवद गाव. यां गावात अनेक लोकांच्या घरांना तडे गेलेत. जमिनींना भेगा पडणं, हे तर आता नेहमीचंच झालंय. ग्रामपंचायत कार्यालयही भूगर्भातल्या धक्क्यांपासून वाचलेलं नाही. रात्री बेरात्री भूगर्भातून प्रचंड आवाज येतात. त्यामुळे या परिसरातल्या वीस गावांची झोप उडालीय.
याआधी दळवट या गावात नेहमीच असे प्रकार होत होते. मात्र आता हा केंद्रबिंदू आता बोर दहीवद झालाय. ठाणे जिल्ह्यातल्या जव्हार भागातही गेल्या वर्षी असेच धक्के बसत होते. हा परिसर १० वर्षांपासून भूकंप प्रवण म्हणून ओळखला जातो. दररोज बसणा-या धक्क्यांची तीव्रता एक रिश्टर स्केलपेक्षा कमी असल्यानं त्याची नोंद करता येत नाहीय.
भौगोलिक परिस्थिती माहिती असतानाही आतापर्यंत कुठलीही आपत्कालीन पूर्वसूचना देणारी यंत्रणा किंवा कार्यालय इथे नाही. त्यामुळे वीस गावांतले ग्रामस्थ जीव मुठीत धरुनच जगत आहेत.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.