www.24taas.com, झी मीडिया, सांगली
संगीत नाटकं जशीच्या तशी सादर करण्याऐवजी बदलत्या सामाजिक चौकटीनुसार नाटकातसुद्धा बदल करावाच लागेल असं मत ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांनी व्यक्त केलंय.
मराठी नाट्यक्षेत्रात मानाचा समजला जाणारा विष्णुदास भावे पुरस्कार महेश एलकुंचवार यांना सांगलीत प्रदान करण्यात आला. त्यावेळी प्रसंगी एलकुंचवार हे बोलत होते. ९३व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन आगाशे यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात आलं.
शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह, गौरवपदक आणि रोख रक्कम असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मागील ४८ वर्षापासून रंगभूमीवर उल्लेखनीय कामगिरी केलेल्या दिग्गज कलाकारांना मराठी रंगभूमी दिनाच्या पार्श्वभूमीवर या पुरस्काराने गौरवण्यात येतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.