www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
भारताचे ऑलिम्पिकचे दरवाजे खुले झाले आहेत. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं भारतीय ऑलिम्पिक महासंघावर बंदी घातली होती.
बंदीनंतर दोन्ही संघटनांमध्ये ल्युसान इथे आज झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत भारताच्या बाजूनं निकाल लागला. पुन्हा एकदा निवडणूक घेण्यास भारतीय ऑलिम्पिक महासंघ तयार झालाय.
दरम्यान, आयओसीच्या या निर्णयामुळे भारतीय क्रीडापटूंना मोठा दिलासा मिळालाय. आता भारतीय क्रीडापटू पुन्हा एकदा ऑलिम्पिकमध्ये भारताची मान अभिमानानं उंचावू शकणार आहेत.
आयओसीबरोबरच्या बैठकीला हॉकी इंडियाचे जनरल सेक्रेटरी नदेंद्र बत्रा आणि झारखंड असोसिसिएशनचे पी.के आनंद यांचा समावेश भारताच्या डेलिगेशनमध्ये होता.
त्याचप्रमाणे क्रीडामंत्री जितेंद्र सिंग, स्पोर्टस सेक्रेटरी पी.के. डेब, बीजिंग ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट अभिनव बिंद्रा आणि सेलर मालव श्रॉफ हेही या बैठकीत भारकताकडून सहभागी झाले होते.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.