आता निवडणूक नाहीच- शरद पवार

आता मला निवडणूकच लढवायची नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. नुकतंच मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्या निवडणूक लढवण्याबाबत विधान करून राज्यभर चर्चेला तोंड फोडलं होतं. त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी पवारांनी कांदा मुद्दा चर्चेत घेऊन उत्तर दिलंय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Nov 4, 2013, 09:20 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, पंढरपूर
आता मला निवडणूकच लढवायची नाही, असं शरद पवार यांनी म्हटलंय. नुकतंच मुख्यमंत्र्यांनी पवार यांच्या निवडणूक लढवण्याबाबत विधान करून राज्यभर चर्चेला तोंड फोडलं होतं. त्यांना थेट उत्तर देण्याऐवजी पवारांनी कांदा मुद्दा चर्चेत घेऊन उत्तर दिलंय.
सध्या सर्व पवार कुटुंबीय दिवाळीनिमित्त बारामतीत आहेत. `कांदा दरवाढीवरून गेली अनेक वर्षे माझ्यावर टीका आणि चर्चा होतात. ती ऐकून आता माझी कातडी बधीर झाली आहे, शेतकऱ्यांना दाम मिळत असेल तर टीका आणि चर्चांचा काही फरक पडत नाही. आता मला निवडणुकच लढवायची नसल्याचं शरद पवार यांनी बारामती इथं एका कार्यक्रमात बोलताना म्हटलं.`
शरद पवार यांच्या निवडणूक न लढवण्यावर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं होतं. मात्र आता यावर आपण निवडणूक लढवणार नसल्याचा पुनरुच्चार स्वत: शरद पवारांनी करत या चर्चेला पूर्णविराम दिलाय. त्यामुळं आतातरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत पवारांच्या निवडणूक लढवण्यावरुन सुरु झालेलं शाब्दिक युद्ध संपेल अशी आशा आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.